सूचना - रिफ्रेशर कोर्स

II हरि ओम II

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

 

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत रिफ्रेशर कोर्स आयोजित केले जातात. या रिफ्रेशर कोर्सची बॅच दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी  व रविवारी दुपारी १२.०० वाजल्यापासून असेल.

हा रिफ्रेशर कोर्स जून महिन्यामध्ये शनिवार दि. २६.०६.२०२१ व रविवार दि. २७.०६.२०२१ या दोन दिवशी दुपारी १२.०० वाजल्यापासून घेण्यात येईल.

सदर रिफ्रेशर कोर्स मध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या डीएमव्हीजनी ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरावा. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या बॅच मध्ये ६० श्रद्धावानांना प्रवेश दिला जाईल.

त्याच प्रमाणे या रिफ्रेशर कोर्सचे संपूर्ण वेळापत्रक ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असेल.

या रिफ्रेशर कोर्स मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व विषयांची उजळणी तसेच बचाव पद्धतींचा सराव सर्व डीएमव्हीजना करता येईल. 

सदर रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येक डीएमव्हीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

गूगल फॉर्म - 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf5n0b_J0D3ic6zjDiv-iuj18z3mJ8gk7XSZauUkwJVGUDhQA/viewform

 

आशुतोषसिंह टेंबे

सदस्य - आयोजन समिती एएडीएम