सूचना - रिफ्रेशर कोर्स

II हरि ओम II

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

 

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत डीएमव्हीजसाठी रिफ्रेशर कोर्स आयोजित केले जातात. हा रिफ्रेशर कोर्स मे २०२२ महिन्यामध्ये शनिवार दि. ७ मे २०२२ व रविवार दि. ८ मे २०२२ या दोन दिवशी दुपारी १२.०० वाजल्यापासून घेण्यात येईल.

सदर रिफ्रेशर कोर्स मध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या डीएमव्हीजनी ए ए डि एम च्या वेबसाईटवर (www.aniruddhasadm.com) उपलब्ध असलेला गूगल फॉर्म भरावा. 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर या बॅच मध्ये ८० डीएमव्हीजना प्रवेश दिला जाईल.

या रिफ्रेशर कोर्स मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व विषयांची उजळणी तसेच बचाव पद्धतींचा सराव सर्व डीएमव्हीजना करता येईल.  

सदर रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येक डीएमव्हीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

 

आशुतोषसिंह टेंबे

सदस्य - आयोजन समिती एएडीएम